राज्यात या तारखेपासून वातावरण बिघडनार..पंजाब डख अंदाज

राज्यात या तारखेपासून वातावरण बिघडनार ; प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला दिला आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून, ३० डिसेंबर २०२५ पर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे. या काळात दिवसाही थंड वारे वाहतील, ज्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा जाणवेल. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून हवामानात मोठे बदल होणार असून राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ADS किंमत पहा ×

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार असले तरी, सध्या राज्यात पावसाचे कोणतेही संकट नाही. त्यामुळे ऊस तोडणी करणारे शेतकरी आणि ऊस कामगारांनी काळजी करण्याचे कारण नाही. तरीही, वेलीवर आधारित पिके आणि फळबागांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी हवामानातील या बदलांची नोंद घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यास त्याबाबतची अधिकृत माहिती पुन्हा दिली जाईल, असेही डख यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment